112 आपत्कालीन: ११२ डायल करा English
भंडारा जिल्हा पोलीसमहाराष्ट्र पोलीस · पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा
नवीन काय आहेनागरिक सेवा पोर्टल — ऑनलाइन तक्रार, भाडेकरू माहिती, हरवले-सापडले नोंद आणि जिल्हा दूरध्वनी सूची.

माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा?

माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी संबंधित शासकीय कार्यालयाच्या जन माहिती अधिकारी (Public Information Officer – PIO) यांच्याकडे लेखी किंवा ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करताना खालील बाबींचे पालन करावे:
1. अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्रव्यवहाराचा पत्ता नमूद करावा.
2. कोणती माहिती हवी आहे, याचा स्पष्ट व मुद्देसूद उल्लेख करावा.
3. माहिती कोणत्या कालावधीतील हवी आहे, हे नमूद करावे.
4. आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मागाव्यात.
5. नियमानुसार अर्ज शुल्क भरावे.
6. अर्ज संबंधित जन माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
7. अर्ज सादर केल्यानंतर पोचपावती किंवा अर्जाचा संदर्भ क्रमांक जतन करावा.

भेट द्या ↗

← मागे

112 WhatsApp वर चॅट करा