माहिती न मिळाल्यास अपील कसे करावे?
जर अर्जदारास निर्धारित कालमर्यादेत माहिती मिळाली नाही किंवा प्राप्त झालेली माहिती अपूर्ण, चुकीची अथवा असमाधानकारक वाटल्यास, अर्जदारास माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९ नुसार अपील दाखल करण्याचा अधिकार आहे.
प्रथम अपील (First Appeal):
- संबंधित जन माहिती अधिकाऱ्याकडून माहिती न मिळाल्यास किंवा उत्तराबाबत समाधान नसल्यास प्रथम अपील दाखल करता येते.
- प्रथम अपील साधारणपणे ३० दिवसांच्या आत संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे दाखल करावे.
- प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याने ३० दिवसांत निर्णय द्यावा. अपवादात्मक परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून ही मुदत ४५ दिवसांपर्यंत वाढवता येते.
द्वितीय अपील (Second Appeal):
- प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याच्या निर्णयाबाबत समाधान नसल्यास किंवा निर्धारित मुदतीत निर्णय न मिळाल्यास महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करता येते.
- द्वितीय अपील निर्धारित नियमानुसार ९० दिवसांच्या आत दाखल करावे.